Pune : मुक्तांगण विज्ञानशोधिकेतर्फे ‘क्रेझी सायन्स कार्निवल’

एमपीसी न्यूज – मुलांना विज्ञानातील किचकट गोष्टी खेळाच्या माध्यमातून शिकवल्या तर त्या त्यांच्या अधिक लक्षात राहतात. खेळातून मुलांना नवनवीन तंत्रज्ञान शिकता यावे, यासाठी मुक्तांगण विज्ञानशोधिकेतर्फे रविवार, दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ४ ते ६ या क्रेझी सायन्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे हे कार्निव्हल होणार आहे. 


या कार्निवलमध्ये विज्ञान प्रात्यक्षिके, कुटुंबासाठी वैज्ञानिक प्रयोग, विज्ञानाशी संबंधित खेळण्यांचे स्टॉल, फूड स्टॉल, पालक आणि मुलांना एकत्रितपणे खेळात येतील, असे वैज्ञानिक खेळ या ठिकाणी असणार आहेत. विज्ञानाला वाहिलेल्या अशा कार्निवलला सर्व विज्ञान प्रेमींनी भेट द्यायला हवी.

नॅशनल कौंसिल ऑफ सायन्स म्युझिअमच्या पाठिंब्याने सुरु झालेल्या नवीन प्रयोगशाळेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा व कल्पनांच्या आधारे नवनवीन संशोधन करावे. या कार्निवलच्या माध्यमातून मुलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून कुटुंबासमवेत वैज्ञानिक खेळांचा आनंद जास्तीत जास्त कुटुंबांनी या कार्निवलमध्ये सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी मुक्तांगण विज्ञानशोधिकेच्या  www.exploratory.org.in  या संकेतस्थळास भेट द्यावी, असे संचालिका नेहा निरगुडकर यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.