Pune : पूरबाधित कुटुंबीयांना पुन्हा ओढ्यानजिकच्या जागेवर हलविण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – पुण्यात 25 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन आंबिल ओढ्याला पूर आला. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी पुणे महापालिकेच्या शाळेत मुक्काम ठोकला. या घटनेला आता सव्वादोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या नागरिकांचे तातडीने पुनर्वसन व्हावे, यासाठी नगरसेवक धीरज घाटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका सर्वसाधारण सभेत तसेच वारंवार अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यलयातही बैठक घेतली. त्याला आता यश आले. पूरबाधित कुटुंबीयांना पुन्हा दांडेकर पूल येथील ओढ्यानजिकच्या जागेवर हलविण्याचा निर्णय महापालिका आणि एसआरए प्रशासनाने घेतला आहे. एनओसीचा प्रश्न मिटेपर्यंंत, त्यांना पूर्वीच्याच जागी पत्र्याचा तात्पुरता निवारा उभारून देण्याचा निर्णय घेतला आहे़.

सुमारे ३८ कुटुंबे सध्या महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये राहत आहेत. या नागरिकांसाठी महापालिकेचे दररोज दहा हजार रुपये खर्च होतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.