Alandi : आळंदीत सलग पाचव्या दिवशी डोळे लागण संख्येत घट

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये डोळे लागण (Alandi) रुग्णांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झालेली दिसून येत आहे. आळंदी शहरातील शाळा व संस्थामध्ये दुबार मुलांची डोळे लागण तपासणी करण्यात येत आहे. तसेच शहरात वैद्यकीय आधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत घरोघरी सर्व्हे चालू आहे.

ग्रामीण रुग्णालयात तपासणी दरम्यान आढळणाऱ्या बाधित रुग्णांना व शाळा, संस्थामधील आढळणाऱ्या बाधित रुग्णांना औषधे दिली जात आहेत.

Pavana Dam Update : पावसाची जोरदार बॅटिंग; पवना धरण 77.80 टक्क्यांवर

दि.27 जुलै रोजी एकूण सर्व्हे झालेली संख्या 29740 इतकी होती. तर, बाधित नवीन रुग्ण 181 इतके होते. आत्तापर्यंत एकूण (Alandi) डोळे आलेल्या रुग्णांची संख्या 7853 इतकी आहे.

तर आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 6361 इतकी आहे. याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.