पिंपरी: PMPML ला पूर्ण वेळ IAS दर्जाचा अधिकारी द्या; दीपाली धुमाळ यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

Deepali Dhumal demands to appoint full time I.A.S level officer in PMPML.

एमपीसी न्यूज – PMPML च्या कामाची व्याप्ती आणि दिवसेंदिवस घटणारे उत्पन्न याबाबी लक्षात घेता, या संस्थेवर IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Pmpml चे अनेक प्रश्न प्रलंबित असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या जवळपास 2 हजार 169 कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. 2 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हे कर्मचारी वैतागले आहेत. शासनाचा आदेश असतानाही या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. त्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, अशी मागणी व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे केली.

मात्र, त्यांनी पैसे नसल्याने वेतन देता येत नसल्याचे सांगितले. पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकांनी आर्थिक मदत करावी, असे गुंडे म्हणाल्या.

PMPML ची स्थापना 2007 मध्ये झाली. पुणे आणि पिंपरी – चिंचवड या दोन शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे काम चालू आहे. कामाची व्याप्ती पाहता या प्राधिकारणास आय. ए. एस. दर्जाचा अधिकारी आवश्यक आहे, असेही धुमाळ यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सुधारणा करण्याचा सपाटाच सुरू केला होता. मात्र, त्यानंतर मुंडे यांची बदली करण्यात आली.

नयना गुंडे यांची यशदा या ठिकाणी बदली झाले आहे. त्यांच्याकडे PMPML चा पदभार आहे. या ठिकाणी आय. ए. एस. दर्जाचा अधिकारी नसल्याने कामगारांचे प्रश्न, संस्थेचे प्रश्न प्रलंबितच राहत आहेत.

त्यामुळे आशा अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी PMPML राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनतर्फेही करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.