Pimple Saudagar : दीपाली जुगूळकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

एमपीसी न्यूज – पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगूळकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाटयगृहात शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या विविध उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले प्रकल्प, शाळा, इमारत या सर्व बाबींचा विचार करून त्यांना हा पुरस्कार मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.