Dehuroad News : श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाच्या कामाला गती

एमपीसी न्यूज – जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणा-या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाश एवढ्या कार्याला साजेसे (Dehuroad News) भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणा-या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर भंडारा डोंगर ट्रस्टच्या माध्यमातून सुरु झालेले मंदिराचे बांधकामाने गती घेतली आहे.

या मंदिरासाठी स्थापत्यविशारद म्हणून आयोध्यानगरीतील  श्री प्रभू रामचंद्रांचे मंदिर ज्यांच्या अलौकिक स्थापत्यकलेतून विराजमान होत आहे. ते चंद्रकांत सोमपूरा व निखील सोमपुरा बंधू कार्यरत आहेत. तसेच मंदिरच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली आहे. गांधीनगर, गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. मंदिराची लांबी 179 फुट, उंची 87 फुट व रुंदी 193 फुट असून मंदिराला तीन भव्य कळस असणार आहेत.

मंदिराचा घुमट 34 फुट बाय 34 फुट असून 13.5 बाय 13.5 फुट आकाराची एकूण 5 गर्भग्रहे मंदिरात असणार आहेत. मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहत भक्तीमध्ये दंग झालेली श्री संत तुकाराम महाराजांची मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे.(Dehuroad News) मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर 900 वैष्णवांच्या प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर 900 वैष्णवांच्या मूर्तींचे सुंदर असे कोरीव काम असणार आहे.

Sangavi News : घरबसल्या पैसे कमावणे पडले महागात, पावणे दोन लाखांची फसवणूक

त्याचप्रमाणे विश्ववंदनीय जगद्गुरू, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संपूर्ण हिंदुस्तानामध्ये रयतेचे राज्य ही लोकशाही पूरक संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात प्रथम अमलात आणली ते हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य – दिव्य शिल्प साकारले जाणार आहे.

भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत आहेत.

मंदिराचे काम मोठ्या प्रमाणात आकार घेऊ लागल्याने माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरीनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास देखील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. आज पहाटेची काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाल्यानंतर गाथा पारायण झाले. सायंकाळी पसयानदानावर हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे निरुपण झाले.

काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले |आवडी धरली पायासवे ||
तुका म्हणे आम्ही विठ्ठलाचे दास | करुनी ठेलो ग्रास ब्रम्ह्डांचा ||
तुकोबारायांच्या या अभंगावर हभप एकनाथ महाराज चत्तरशास्त्री यांची कीर्तन सेवा झाली.

मंदिरा जवळ असणा-या पार्किंगच्या जागेवर महाप्रसादासाठी मंडप उभारल्या कारणाने मंदिराकडे येणा-या रस्याच्या बाजूला 500 मि अंतरावर चार चाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. तळेगाव एमआयडीसी अंतर्गत इंदोरी पोलीस सबस्टेशनचे पोलीस कर्मचारी बंधू पार्किंगचे उत्तम नियोजन करीत आहेत. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांनी देखील पोलीस कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्ट व पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.