Dehuraod : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 15 नवे रुग्ण ; एकाचा मृत्यू

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. : 15 new patients in cantonment today; Death of one

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, बरलोटा नगर (हस्ती बिल्डिंग ), आंबेडकर नगर, मेहता पार्क ( केएम पार्क ), मामुर्डी, श्री विहार, दांगट चाळ, पराग अपार्टमेंट (बीएसएनएल ऑफिस ), झेंडे मळा, चिंचोली, थॉमस कॉलनी शितला नगर न. 1 या परिसरात आज, शनिवारी एका दिवसात 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत हद्दीत एकूण 483  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 15 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी भाग, गृहनिर्माण संस्था आणि बाजारपेठ या भागातील असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या ४1 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

138 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 29 रुग्ण उपचार घेत आहे.  तर आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 14 इतकी आहे.

दरम्यान,  आज 7 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 261 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.