Dehuroad Crime News : जुगार अड्ड्यावर देहूरोड पोलिसांचा छापा; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – आंबेडकरनगर, देहूरोड येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर देहूरोड पोलिसांनी शनिवारी (दि. 14) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

अक्षय अशोक दूधघागरे (वय 27), रफीक रसूल मुजावर (वय 51), सायबु भीमराव तेलगू (वय 45), साईनाथ संजय माहूरी (वय 27), रवींद्रकुमार राजनाथ यादव (वय 47), राहुल उत्तम अलकुंडे (वय 28, सर्व रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड मधील आंबेडकरनगर येथे काहीजण 27 पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी सहा जणांना अटक केली. तसेच 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.