Thergaon News : स्वातंत्र्यदिनी नुक्कड नाटकातून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी नुक्कड नाटकातून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. प्रभाग क्रमांक 24 मधील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकूल, शाळेतील विद्यार्थी व आरोग्य विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी ‘समजो और जानो शहर सुंदर बनाना पहचानो’ शिर्षकाखाली प्लास्टिक बंदीबाबत नुक्कड नाटक सादर करण्यात आले. गणेश नगर (डांगेचौक बाजारपेठ), राहटणी चौक, राहटणी, थेरगाव पाण्याची टाकी या भागामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नाटाकातून नागरिकांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देत, प्लास्टिक वापर टाळण्याबाबत सुचना व जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेत ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, सहायक आरोग्य आधिकारी राजू बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, शेखर निंबाळकर, अतुल सोनवणे, सतिश इंगेवाड, मुकादम संतोष ओव्हळ, आरोग्य मुकादम प्रदीप जगताप, मुख्याध्यापक नटराज जगताप, आरोग्य कर्मचारी अभय दारोळे, अरुण राऊत, प्रशांत पवार, राजू जगताप, अनिल डोंगरे, सूर्यकांत चाबुकस्वार, अमन वाल्मिकी व ठेकेदार, कामगार यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.