Dehuroad : सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली ‘सीईओं’ची भेट

A delegation from the nuclear community met the CEOs to start a salon business

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व सलून व्यवसाय बंद आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक आणि कारागिरांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे सलून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी शहरातील नाभिक समाजाकडून करण्यात आली आहे.

शहरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह देहूरोड नाभिक सेवा संघाच्या नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

२२ मार्चला देशात पहिला लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय ठप्प झाले. सध्या चौथा लॉकडाऊन सुरु आहे. जवळपास दोन महिन्यापासून सलूनच्या दुकानातील कारागीर आणि मालक घरी बसून आहेत. या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे.

सध्या पिंपरी चिंचवड महापालिका व अन्य ठिकाणी सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास काही अटी आणि शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर देहूरोड हद्दीतील सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी नाभिक समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.

यावेळी नाभिक संघाचे मुबारक अली शेख, मन्सूर अली शेख , शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग मारीमूतू, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, नगरसेवक विशाल खंडेलवाल, गोपाळ तंतरपाळे, अमोल नाईकनवरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.