Dehuroad News : देहूरोड डॉक्टर्स अससोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. महेश कुदळे

उपाध्यक्ष डॉ. गणेश राऊत, सहसचिवपदी डॉ. मंजुषा सावंत

एमपीसीन्यूज : देहूरोड डॉक्टर्स अससोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. महेश कुदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. या प्रसंगी देहूरोड डॉक्टर्स अससोसिएशनचे  डॉ. श्रीनिवास बन्सल, डॉ. विजय चौधरी, डॉ. भूषण कुलकर्णी, डॉ. संदिप सांडभोर, डॉ. विश्वास टकले, डॉ. सुनील मुदगडे, डॉ. राजेंद्र चवात आदी उपस्थित होते.

नूतन अध्यक्ष डॉ. महेश कुदळे यांनी असोसिएशनची कार्यकारिणी निवडताना अससोसिएशनच्या इतिहासात प्रथमच महिला डॉक्टरांनाही समाविष्ट केले. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष डॉ. महेश कुदळे, उपाध्यक्ष डॉ. गणेश राऊत, डॉ. जयेश कदम, सचिव डॉ. सुनील आठवले, सहसचिव डॉ. मंजुषा सावंत, खजिनदार डॉ. सुभाष जाधवर, सहखजिनदार डॉ.तेजीस्विनी बिडवे, तसेच अन्यपदी डॉ. मृणाल पोंडेकर, डॉ. शीतल कुदळे, डॉ. नेहा खंडेलवाल, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अशपाक बांगी, डॉ. अभिजित देवरे, डॉ. मधुसूदन पतंगे, डॉ. शैलेश तानवाडे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. मोहित गोयल,डॉ. संकल्प महाजन, डॉ. रफिक शेख,डॉ. संतोष गाडे.

डॉ. महेश कुदळे म्हणाले, देहूरोड डॉक्टर्स अससोसिएशनसाठी ‘Engage D. D. A change lives’ ही थीम या वर्षी साठी दिली. या अंतर्गत देहूरोड परिसरातील रुग्ण व डॉक्टर्स यांचे नाते विश्वासक करणे तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधारणे यावर विशेष काम केले जाईल. कोविडच्या बिकट कालावधीत डॉक्टर्स व रुग्णालये यांची वस्तुस्थिती कशी होती. या संकटात कुटुंबांना वेळ न देता तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड 19 विरुद्ध कसा लढा दिला, यावर वस्तुस्थिती दाखवणारी ‘DURA’ नावाची शॉर्ट फिल्म youtube चॅनेलवर प्रसारित केली.

या वर्षात एक दुर्गम खेडे दत्तक घेणे. असोशिएशनचे भवन तयार करणे तसेच डॉक्टरांसाठी नवीन कार्यशाळा घेणे, सामाजिक कार्य करणे, सांस्कृतिक व वेगवेगळे खेळाचे आयोजन करणार असल्याचे डॉ. कुदळे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन डॉ. राहुल पावरगी यांनी केले. डॉ. नितीन महाजन यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.