Dehuroad News : सलामती पीर ट्रस्टच्यावतीने शंभर गरिबांना जीवनावश्यक साहित्य वाटप

Former Chairman of Maharashtra State Minorities Commission Haji Arafat Sheikh

एमपीसीन्यूज : नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सलमती पीर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने शंभर गरगरिब नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयासमोरील केएम पार्क बिल्डिंगच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय बंद पडले. यात हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे तर मोठे हाल झाले. आता अनलॉक सुरु झाला तरी अनेकांना या संकटातून सावरणे कठीण जात आहेत. काही गरीब घरची कमावती व्यक्तीच कोरोनाने हिरावून नेली. त्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशा परिस्थितीत या पीडित व आर्थिक परिस्थिती खालावलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या समर्थकांनी पुढाकार घेतला.

दरवर्षी देहूरोड येथे शेख यांचे समर्थक कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरे करतात. यंदा मात्र, वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम गरीब कुटुंबांना मदत म्हणून देण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार गरिबांना दैंनदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. सुमारे शंभर नागरिकांना हे कीट वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन आब्बास शेख, फरहत अत्तार, मिंकु मल्हौत्रा, अशरफ अत्तार, कैलास करमारे, सागर मोरे, जस्सी रत्तू, असिफ सय्यद, कासिम शेख आदींनी केले.

संकट काळात जीवनावश्यक साहित्य मिळाल्याने गरीब नागरिकांनी समाधान व्यक्त करीत या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.