Dehuroad News: दीपक भोंडवे यांच्यावतीने माजी सैनिकांचा गौरव

एमपीसी न्यूज: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांच्या वतीने रावेत येथे माजी सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात सैन्यदलात विविध पदे भूषविलेल्या तसेच निवृत्तीनंतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सन्मानाने माजी सैनिक भारावून गेले होते. या कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर गीतांचा सांगीतिक कार्यक्रम तसेच नृत्य अविष्कार आयोजित करण्यात आला होता. माजी सैनिकांतर्फे सोहळा आयोजित केल्याबद्दल दीपक भोंडवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष भोंडवे, संकल्प भेगडे, संदेश साळुंखे, अशोक माने, प्रतीक करोडे, संतोष सक्सेना, अभिजित शिनगारे, सुजित शिनगारे, गोपीचंद पावरा आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.