Senior PI Shriram Pol : वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांचा गौरव

पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल रावेतच्या ग्रामस्थांनी केला गौरव

एमपीसी न्यूज – पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल रावेत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ (Senior PI Shriram Pol) यांचा नुकताच पोलीस महासंचालक पदकाने सन्मान करण्यात आला. यानिमित्त रावेत येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्या हस्ते पोळ यांचा रावेत ग्रामस्थांच्यावतीने गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संतोष भोंडवे, आर. के. सिंग, निलेश पाटील आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ (Senior PI Shriram Pol) यांनी आपल्या 25 वर्षांच्या पोलीस दलातील सेवेत अतिशय उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरी केली आहे. सेवा बजावताना त्यांना एकदाही शिक्षा झालेली नाही. तसेच त्यांचे रेकॉर्ड कायम चांगले राहिले आहे.

IPS Krishna Prakash : दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी!

अनेक गुन्ह्यांचा त्यांनी गुणवत्तापूर्ण तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रावेत येथे सप्टेंबर 2021 मध्ये एका महिलेचा खून झाला होता. आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे नसताही पोळ यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना जेरबंद केले. अशा अनेक किचकट प्रकरणांचा उलगडा करण्यात त्यांना यश आले. त्यांच्या (Senior PI Shriram Pol) या कार्याची दखल घेत त्यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव करण्यात आला.

Pune News – FTII च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार

पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलीस अधिकारी रावेत पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांमुळे कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यास मदत होते. तसेच सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात अनुभवता येते. शिवाय गुन्हेगारी नियंत्रणात राहते असे मत सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.