Dehuroad : भंडारा डोंगरावर 500 रोपांची लागवड

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भंडारा डोंगरावर 500 रोपे लावून वृक्षारोपण करण्यात (Dehuroad) आले.

मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र महाराष्ट्र-राज्य पुरस्कार प्राप्त अरुण पवार आणि मित्रपरिवार, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव आणि माऊली भक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त  5 हजार  वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगरापासून 500 रोपांचे वृक्षारोपण करून करण्यात आली.

India : सुनील गावस्कर कर्णधार रोहित शर्मावर नाखूष

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे ज्येष्ठ नागरीक संघ, वारकरी संप्रदायातील माता भगिनी ,मराठवाडा भूमिपुत्र यांच्या उपस्थितीत झाडे लावा झाडे जगवा . झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी या सुंदर विचारांनी प्रेरित होऊन रोपांची लागवड करण्यात आली. निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येक जण स्वंयप्रेरणेने कार्य करत होता. युवकांपासून ते ज्येष्ठ नागरीकांनी बघता बघता 500 रोपे लावली.

उद्योजक  डी. एस.राठोड ,ह.भ.प. गजानन वाव्हळ ,माजी नगरसेवक आप्पा बागल ,आण्णा जोगदंड , संगिता जोगदंड , बळीराम माळी , बाळासाहेब सांळुखे,मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती सदस्य नितीन चिलवंत,मराठवाडा जनविकास संघ सोशल मिडीयाप्रमुख  अमोल लोंढे,भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघ ,भीष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ ,श्री. स्वामी समर्थ महिला मंडळ काशीद पार्क ,वंदे मातरम् संघटना पिंपळे गुरव , आर जे स्पोर्ट अ‍ॅकॅडमी नॅशनल खेळाडू रोहीत जाधव   हनुमंत काशीद, मुंजाजी भोजने , बुध्दभुषण विहार संस्थापक अध्यक्ष पुणाजी रोकडे ,आदींनी सहभागी होऊन वृक्षारोपण (Dehuroad)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.