Dehuroad Crime News : मेंढरांसह मेंढपाळास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – चिंचोली येथील सैन्याच्या जागेत मेंढरे चारण्यासाठी घेऊन आल्याने मेंढपाळ आणि त्याच्या चार मेंढरांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 22) दुपारी देहूरोड परिसरातील चिंचोली येथील सैन्याच्या मोकळ्या जागेत कचरा डेपो येथे घडली.

मल्हारी बापू गलांडे (वय 18, रा. चिंचोली देहूरोड) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दोन अनोळखी महिला आणि कांबळे याचा मुलगा (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेंढरे चारण्यासाठी सैन्याच्या मोकळ्या जागेतील कचरा डेपो येथे घेऊन गेले. त्या वेळी फिर्याद यांच्या तोंड ओळखीच्या कांबळे या व्यक्तीच्या मुलाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मेंढरे चारण्यासाठी आल्याच्या कारणाने आरोपींनी हातातील लाकडी काठीने मेंढरांना बेदम मारहाण करून चार मेंढरांना जखमी केले. आरोपींना अडविण्यासाठी फिर्यादी गेले असताना त्यांनाही काठीने मारहाण करून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.