Dehuroad: पूर्ववैमनस्यातून तिघांना बेदम मारहाण; एकाला अटक

Dehuroad: Three beaten to of prejudice; One arrested आरोपी जुन्या भांडणाच्या कारणावरून शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन आले.

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी मिळून तीन भावांना कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शुक्रवार (दि.19) रात्री आठ वाजण्याच्या सुमरास आंबेडकर नगर देहूरोड येथे घडली. याप्रकरणात देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आकाश आरमुगम पिल्ले (वय 28, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिल्ले याच्यासह डुंग्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मोहम्मद तोहफिक रंगरेज (वय 29, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुन्या भांडणाच्या कारणावरून शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन आले. आरोपींनी फिर्यादी मोहम्मद आणि त्यांचा भाऊ तारीख वाहिद रंगरेज यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. यात दोघे जखमी झाले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचा दुसरा भाऊ कुलशेद रंगरेज यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.