Pune: पुणे महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकाला कोरोना

Pune: Corona to Congress corporator in pune महिला पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईला उपस्थित असणारा एक गटनेता आणि आमदाराची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेतील महिला पदाधिकारी आणि तिच्या पतीला कोरोना झाल्याची घटना ताजी असतानाच आता काँग्रेसच्या नगरसेवकलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नगरसेवकांचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर वाढत असल्याचे चित्र अद्यापही काही कमी होताना दिसून येत नाही. महिला पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईला उपस्थित असणारा एक गटनेता आणि आमदाराची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

इतर गटनेत्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर, त्या महापालिका पदाधिकारी यांच्या कार्यालयातील एक कर्मचाऱ्यालाही कोरोना झाला आहे. तसेच, महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याबरोबर असणाऱ्या जवळच्या कार्यकर्त्यालाही कोरोना झाला आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे 11 हजार 854 रुग्ण झाले आहेत. 504 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातून आजपर्यंत 7 हजार 264 नागरिक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याचे कारण नाही. वेळीच उपचार, काळजी घेतल्यास कोरोना सुध्दा बरा होऊ शकतो, हे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी दाखवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.