Dehuroad : किवळे येथे टोळक्याचा राडा; एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – किवळे (Dehuroad) येथे सात जणांच्या टोळक्याने राडा घातला. एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याच्या बहिणीला धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

Hinjawadi : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला, श्रीकांत डायरे आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. ‘तुझा भाऊ कुठे आहे. तुझ्या भावाला आता जिवंत ठेवणार नाही. तुमची इज्जतच काढतो’ असे म्हणत फिर्यादीस धमकी दिली. फिर्यादी यांच्या लहान भावाला सोसायटीच्या पार्किंग मध्ये गाठून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

यात फिर्यादी यांचा भाऊ जखमी झाला. फिर्यादी यांचे वडील आणि वहिनी हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. फिर्यादी यांनी या भांडणाचा व्हिडीओ मोबाईल मध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी महिलेने फिर्यादी यांचा मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून त्याचे नुकसान झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

https://youtube.com/shorts/WlTz7wYG3vI?si=a1pzmLBNzMuZfA8c

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.