Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत सोमवारपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

7-day lockdown from Monday in cantonment boundary : आज एकूण 7 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 13 ते 19 जुलै या कालावधीत सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली. दरम्यान आज, शनिवारी एकूण 7  पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन या ठिकाणी दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतही गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी 28  रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर सध्या 16  कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयलोशनमध्ये 4  रुग्ण आहेत. तर आजपर्यंत 3  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज, शनिवारी एकूण 7  पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोनाचे संक्रमण मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहे. त्यामुळे हद्दीत 13 ते 19 जुलै या कालावधीत सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कालावधीत दूध विक्री सकाळी 7  ते 10 या वेळेत सुरु राहणार आहे. तसेच मेडिकल, सरकारी कार्यालये, गॅस एजंसी, बँका, पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

लॉकडाउनच्या काळात कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like