Delhi : घरगुती गॅस सिलेंडर 52 रुपयांनी स्वस्त!; नवे दर एक मार्चपासून लागू

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर 52 रुपयांनी स्वस्त करून दिलासा दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर एक मार्चपासून लागू झालेत.

विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (सुमारे 14.2 किलोग्रॅम) 52 रुपयांनी स्वस्त झाला असून 893 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मार्च महिन्यापासून 841 रुपयांना मिळणार आहे. फेब्रुवारीमध्ये 144.50 रुपये इतकी वाढ झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.