Delhi : भारतात तीन कोटींहून अधिक कोरोना चाचण्या

14 जुलै पर्यंत 1.2 कोटी कोरोना चाचण्या झाल्या होत्या. हा आकडा 16 ऑगस्ट रोजी 3 कोटी झाला आहे. : More than three crore corona tests in India

एमपीसी न्यूज – लक्ष्यकेंद्री, सातत्यपूर्ण आणि केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून भारताने 3 कोटी चाचण्या करत नवा टप्पा पार केला आहे.

निदानासाठीच्या प्रयोग शाळांच्या जाळ्याचा विस्तार आणि देशभरात या चाचण्या सहज उपलब्ध होण्याची सुविधा यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यासाठी मोठी चालना मिळाली आहे.

गेल्या 24 तासात 7 लाख 31 हजार 697 चाचण्या करण्यात आल्या आहेत. दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यादिशेने भारताची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

दहा लाख लोकांमध्ये 21 हजार 769 चाचण्या करण्यात येत आहेत.

14 जुलै पर्यंत 1.2 कोटी कोरोना चाचण्या झाल्या होत्या. हा आकडा 16 ऑगस्ट रोजी 3 कोटी झाला आहे.

याच काळात पॉझिटीव्हिटी दर 7.5 टक्क्यांवरून 8.81 टक्के झाला. चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यानंतर सुरवातीला पॉझिटीव्हिटी दरात सुरवातीला वाढ होईल मात्र तत्पर विलगीकरण, शोध आणि वेळेवर वैद्यकीय व्यवस्थापन यासह इतर उपाय योजनांमुळे हळू हळू या पॉझिटीव्हिटी दरात दिल्लीप्रमाणे घट होईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.