Pune News: बाजार समिती आवारातील व्यापार नियममुक्त करा, अन्यथा आंदोलन; दि पूना मर्चंट्‌स चेंबरचा इशारा

बाजाराबाहेरील व्यापार आणि विदेशी कंपन्यांबरोबर स्पर्धा करणे अशक्‍य होणार आहे. त्यामुळे परंपरागत व्यापार टिकविण्यासाठी बाजारातील शेतीमाल नियमनमुक्त झाला पाहिजे.

एमपीसी न्यूज – शेतीमाल नियमन मुक्त न केल्यास बाजारातील व बाजाराबाहेरील वस्तूंच्या किंमतीत फरक पडेल. बाजारातील किंमतीपेक्षा वस्तूंची बाहेरची किंमत स्वस्त असेल. त्यामुळे बाजारातील व्यापाराचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बाजारात येणारा शेतीमाल नियमनमुक्त न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दि पूना मर्चंटस्‌ चेंबरतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.

राज्य शासनाने बाजारातील शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी संघटनेतर्फे पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड, माजी अध्यक्ष संचालक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया उपस्थित होते.

पोपट ओस्तवाल म्हणाले, बाजाराबाहेरील व्यापार आणि विदेशी कंपन्यांबरोबर स्पर्धा करणे अशक्‍य होणार आहे. त्यामुळे परंपरागत व्यापार टिकविण्यासाठी बाजारातील शेतीमाल नियमनमुक्त झाला पाहिजे.

एमआयडीसीच्या धर्तीवर देखभाल दुरूस्ती खर्च आकारण्यात यावा, भूखंडाच्या मालमत्ता करामध्ये कपात करण्यात यावी, परवाना ऑनलाइन करावा, व्यापारी परवाना पाच वर्षांसाठी करावा, अशा अनेक मागण्याही करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.