Dighi crime News : फुगेवस्तीमधील तुळजाभवानी मंदिराजवळ आढळले स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज – फुगेवस्ती, दिघी येथे तुळजाभवानी मंदिराजवळ एक स्त्री अर्भक सापडले. ही घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळी सव्वासहा वाजता उघडकीस आली.

पोलीस नाईक किशोर बळीराम कांबळे यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील फुगेवस्ती येथे तुळजाभवानी मंदिराच्या जवळ मोकळ्या जागेत अज्ञातांनी स्त्री अर्भक टाकले. हे नवजात अर्भक चार ते पाच दिवसांचे आहे. अज्ञातांनी त्याला जाणीवपूर्वक असुरक्षितपणे उघड्यावर टाकून त्याचा परित्याग केला आहे.

तुळजाभवानी मंदिराच्या जवळ हे स्त्री अर्भक सापडल्याने परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे म्हणाले, “बाळाची प्रकृती उत्तम आहे. किरकोळ व्याधीमुळे बाळाला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. तसेच एका चिल्ड्रन केअर सेंटरकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या बाळाला कुणी जाणीवपूर्वक बाहेरुन आणून ठेवले. तसेच परिसरातील लोकांनी हा प्रकार केला आहे का, याबाबत चौकशी सुरु आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.