Dighi Crime News : घराबाहेर मुरूम टाकल्याचा रागातून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – घराबाहेर मुरूम टाकल्याच्या रागातून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत पिता- पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी गणेशनगर, बोपखेल येथे घडली.

जंगबहादुर श्रीमोतीचंद यादव (वय 52) आणि त्याचा मुलगा (दोघे रा. गणेशनगर, बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या घराबाहेर मुरूम टाकला. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तसेच आरोपीच्या मुलाने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.