Dighi : पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – उसने दिलेल्या पैशाचा हिशोब मागितल्याच्या रागातून पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि.27) सायंकाळी साडे सातच्या सुमारास दिघी येथे घडली आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निवांत उद्धव उघडे (वय 34, रा. दिघी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीला 9 हजार रुपये उसने दिले होते. याप्रकरणी हिशोब मागितल्याचा रागातून आरोपीने पिडीतेच्या घरी जाऊन पतीला मारहाण केली तसेच पिडीतेलाही धक्काबुक्की करत अश्‍लिल बोलल्याप्रकरणी निवांत विरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.