Dighi: मैत्रीदिनानिमित्त दिघीतील दत्तगड डोंगरावर वृक्षारोपण 

एमपीसी न्यूज  – मैत्रीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड कामगार कल्याण युवा मंच, साई प्रतिष्ठान आणि भोसरीतील शिव प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने दिघीतील दत्तगड डोंगरावर 200 रोपांची लागवड करण्यात आले. त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आवळा, जांभूळ यासह विविध जातींच्या रोपांचा समावेश आहे. 

युवराज लांडगे, सुभाष नकाते, नागेश पडवळ, अमोल खांडेकर, विकास काळजे, अनिल घाडगे, राहुल काळजे, दिलीप परदेशी यांच्यासह कामगार कल्याण युवा मंच, साई प्रतिष्ठान आणि भोसरीतील शिव प्रतिष्ठाणच्या कपदाधिका-यांनी दत्तगड डोंगरावर टिकावू आणि ऑक्सीजनची निर्मिती करणा-या 200 देशी रोपांची लागवड केली. तसेच दत्तगड परिसरातील प्लॉस्टिक, पाण्याचा बाटल्यांसह सगळ्या कचरा गोळा करुन दत्तगड परिसर चकाचक केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.