Pimpri : किरकोळ कारणावरून वाद; एक जण गंभीर

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद झाल्यानंतर निघून जात असताना तरुणाने इसमाच्या डोक्यात मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि 28) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी ब्रिज खाली मटण मार्केट जवळ घडली.

दौलतराव गीताराम चौधरी (वय 41, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा चंदनसिंग (वय 20, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलतराव आणि कृष्णा यांच्यामध्ये मंगळवारी दुपारी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद झाल्यानंतर निघून जात असताना कृष्णाने पाठीमागून येऊन दौलतराव यांच्या डोक्यात मारले. यामध्ये दौलतराव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.