Pune : सारसबागेत फिरायला येणाऱ्यांना देशी वृक्षांचे वाटप

एमपीसी न्यूज – ‘एक झाड, एक कुटुंब’ या संकल्पनेतून खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युथ कनेक्ट व अर्बन सेल यांच्या वतीने पुण्यातील (Pune) सारसबागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांना देशी झाडांचे वाटप करण्यात आले.

Talegaon Dabhade : ऐतिहासिक तळ्याची दुरावस्था; जागतिक पर्यावरण दिनी मनसे स्टाईलने प्रशासनाला विचारणार जाब

जागतिक तापमानवाढ हा मुद्दा सध्या सातत्याने चर्चिला जात असताना त्यावर काम करण्यासाठी तसेच पुणे शहराला सर्वार्थाने राहण्यायोग्य शहर बनविण्याच्या उद्देशाने हे झाडांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन युथ कनेक्टचे अध्यक्ष राहुल पोटे यांनी केले. या उपक्रमास युथ कनेक्टचे सदस्य, अर्बनसेलचे नितीन कदम स्वप्निल दुधाने, नितीन जाधव, गिरीश गुरनानी, समीर पवार, राकेश कामठे, कृषी उप्त्पादन बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, मनोज पाचपुते, गणेश नलावडे, फईमभाई शेख, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप, श्वेता संग्राम होनराव, सोनाली गाडे, गितांजली सारगे, स्नेहल शिंगारे, वैजंती घोडके, विना कात्रे, शिवानी माळवदकर, डॅा मीनु भोसले, ऋुषिकेश भुजबळ, सुशांत ढमढेरे, प्रशांत कुदळे, रुपेश अखाडे, शिवम ईभाड, रुपेश संत, प्रशांत प्रभाले, स्वप्निल खडके, स्विकार देशपांडे, मिनाज शेख, डॅा राहुल सुर्यवंशी, श्रेया तांबे, पुजा धोत्रे, राजलक्ष्मी सारोळकर, स्मिता मधुरकर, अश्विनी जाधव, प्रमित गोरे, मच्छिन्द्र उत्तेकर, ओम कासार, गैारव कापरे, सचिन बेनकर, अभिजीत बारवकर, संकेत शिंदे, संतोष डोख, प्रदिप सांगळे, अमर परदेशी, शंकर शहाणे आदि उपस्थित होते.

Maharashtra News : महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा लोकेश चंद्रा यांनी स्वीकारला पदभार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.