Pimpri News : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप

एमपीसी न्यूज – नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नवीन वर्षाच्या सुरवातीला सुरक्षितता किट वाटप करण्यात आले. यावेळी आमदार बनसोडे यांच्या हस्ते नोंदित बांधकाम कामगारांना योजनेतून मिळणाऱ्या सुरक्षितता किट वाटप करण्यात आले.

यावेळी बांधकाम कामगार विक्रांत शिंदे, दत्तात्रय शिंदे, कल्पना धाकड, विदुला पिंजण, अश्विनी मोहिते, वीरेंद्र खिलावन, सुनीता खिलावण, संजीवनी कुलकर्णी, संगीता बुरुते, स्वाती मोरे, अर्चना शिरकर, सुरेखा मोरे, सुजाता कदम व सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे उपस्थित होत्या.

सुरक्षा किटमध्ये बॅटरी, हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा, मच्छरदाणी, बॅग , पाण्याची बाटली, बूट, दोरी, हातमोजे, मास्क, जॅकेट हेडफोन इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. 150 कामगारांना किट वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.