Pune : कोणतेही पायंडे पाडू नका : अजित पवार

राज्य सरकारने लक्ष घालावे

एमपीसी न्यूज : तुळजा भवानी मंदिरात भाविकांना प्रवेश करण्यासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने एक नियमावली जाहीर करण्यात आली होती.अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य,अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या (Pune) नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. असा फलक मंदिर परिसरात लावण्यात होता. यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

Pune : शरद पवार यांनी केवळ ऐकण्याची भूमिका घेतली : अजित पवार

त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, तुळजापूर येथील मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी कपड्यावरून निर्बंध घालण्यात आले. लहान मुलांना मंदिराबाहेर थांबविण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हाफ पँट घातली म्हणून मुलांना दर्शन नाकारले. ही कोणती पद्धत काढली.

कोणता देव म्हणतो की,लहान मुलांनी हाफ पँट घातली. तर दर्शन देणार नाही असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आपल्या प्रत्येक पंथामध्ये वेगवेगळे पेहराव असतात. आपण सर्वजण त्यांचे पालन करतो. पण काल मुलांना मंदिरा बाहेर उभा केले.हे अंत्यत आक्षेपार्ह असून राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे. अशी भूमिका त्यावर अजित पवार यांनी (Pune) मांडली.

महाविकास आघाडीचा पोपट मेला नाही : अजित पवार

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे.अशी टिका केली आहे.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,पोपट मेलेला दखवा तरी कुठे मेला आहे.महाविकास आघाडीमध्ये आगामी निवडणुकींच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे.

लोकसभा निवडणूकीमध्ये कोणाला किती जागा मिळाव्यात या बाबतचा निर्णय तीन ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. तसेच एकत्र बसून समन्वय साधण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. सामंजस्यांने मार्ग काढण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. अशी भूमिका यावर त्यांनी मांडली.

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे : अजित पवार

डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी देशाची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवली. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रदीप कुरुलकर यांनी जे काही केले आहे. देशद्रोह असून त्याबाबतचे सर्व पुरावे समोर आले आहेत. अशा व्यक्तींवर जबरदस्त कारवाई केली पाहिजे.

त्याकरिता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले गेले पाहिजे. जेणेकरून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कोणत्याही स्वरूपात माफ केले जाणार नाही. हा संदेश गेला पाहिजे.तसेच कुरूलकर हे कोणाशी संबंधित होते. (Pune) याबाबतची माहिती पत्रकारांनी आणि जनतेनेही खोलवर जाऊन घेतली पाहिजे. पण अंगाशी आले की काही लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात. अशा शब्दात अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली.

Hinjawadi : पावसाळापूर्व कामासाठी हिंजवडी येथील वाहतुकीत बदल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.