Dr. Amol Kolhe : शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात; पहिल्या दिवशी आठ गावांमध्ये पदयात्रा, सभा आणि मशाल मोर्चा

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या ( Dr. Amol Kolhe)  विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चाला शिवनेरी येथून बुधवारी (दि. 27) सुरुवात झाली आहे. दिवसभरात आठ गावांमध्ये हा शेतकरी आक्रोश मोर्चा जाणार आहे.

शिवनेरी जुन्नर येथून निघालेला आक्रोश मोर्चा ओतूर येथे येईल. तिथे पदयात्रा होईल. पुढे आळेफाटा येथे सभा होणार आहे. नारायणगाव येथे देखील पदयात्रा आणि सभा होईल. दुपारनंतर कळंब येथे पदयात्रा होईल. त्यानंतर मंचर आणि राजगुरूनगर येथे देखील सभा होतील. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पहिल्या दिवसाचा शेवट चाकण येथील मशाल मोर्चाने होईल. हा मोर्चा पुढे केंदूर येथे जाईल.

Pune : आता विद्यार्थी संघटनांसाठी नियमावली व बंधने ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय

शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची मंगळवारी भेट घेतली. मोर्चा बाबत शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले होते. हा मोर्चा केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघापुरता मर्यादित नसून तो बारामती लोकसभा मतदारसंघातून देखील निघणार आहे. इंदापूर, पाटस, लोणी काळभोर आणि इतर गावांमधून हा मोर्चा काढला जाणार आहे. 30 डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या शेतकरी आक्रोश मोर्चाची एका सभेने सांगता होणार आहे.

शेतकरी आक्रोश मोर्चाच्या प्रमुख मागण्या

* कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी. कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे.
*खासगी व शासकीय असा भेद न करता दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे.
*बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित विजपुरवठा व्हावा.
*पिक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी.
*शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.
*शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे ‘शैक्षणिक कर्ज’ धोरण लागू करावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.