Pune : आता विद्यार्थी संघटनांसाठी नियमावली व बंधने ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले विद्यापिठ्यात मध्यंतरी ( Pune ) जे तणाव पूर्वक प्रसंग घडले त्या पार्श्वभूमीवर विद्यापिठाने विद्यार्थी संघटानासाठी एक नियमावली तयार केली आहे. ज्यामध्ये संघटांवर काही निर्बंध घालून त्यांची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

या नियमावलीनुसार आता विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांसाठी कार्यक्रम, उपक्रम, आंदोलनांसाठीची कार्यपद्धती निश्चित केली असून, विद्यार्थी संघटनांना उपक्रम, कार्यक्रमांसाठी किमान पाच दिवस आधी पूर्वपरवानगी, निश्चित केलेल्या जागेतच कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्याचे बंधन घालण्यात आले असून, विद्यापीठाचे नुकसान न होण्याबाबतचे लेखी हमीपत्र ही द्यावे लागणार आहे.

Vadgaon : वडगावमध्ये गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत 

तसेच विद्यापीठाच्या आवारात कोणतेही उपक्रम, आंदोलन, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. पूर्वपरवानगीचा अर्ज किमान पाच दिवस आधी द्यावा लागणार आहे. पूर्वपरवानगीचा अर्ज दिला आणि त्याची पोहोच घेतली म्हणजे परवानगी दिली असे ग्राह्य धरले जाणार नाही. परवानगीसाठीचा अर्ज ऐनवेळी किंवा उशिरा दिल्यास परवानगी दिली जाणार नाही.

तरीही कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन केल्यास, त्यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित संयोजकांची असेल. कोणत्याही कार्यक्रम, उपक्रमांसाठी विद्यापीठातील संविधान स्मारकाशेजारील मोकळी जागा निश्चित करून देण्याचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतला आहे.

पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याची प्रत विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला देणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय कार्यक्रम, उपक्रम केल्यास, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कार्यक्रम, उपक्रमावेळी विद्यापीठाच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे नुकसान होणार नाही याबाबतचे लेखी हमीपत्रही द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान य़ाबाबात विद्यार्थी संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी चर्चा करून त्यास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यासाठीची बैठक 8 जानेवारी रोजी विद्यापीठात होणार असल्याची माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात ( Pune ) आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.