Vadgaon : वडगावमध्ये गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत 

एमपीसी न्यूज – दत्त जयंती निमित्त पुनावळे ते खोपोली (Vadgaon) येथे श्री दत्त गगनगिरी महाराज पायी ज्योत नेली जाते. या ज्योतीचे वडगाव मावळ येथे स्वागत करण्यात आले. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष अतुल राऊत यांच्या हस्ते पायी ज्योतीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

Talegaon Dabhade : नगरपरिषदेने ठेकेदाराऐवजी दिले महावितरणाला पावणे दोन कोटी, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मावळ विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी श्री दत्त गगनगिरी सेवा मंडळाचे मार्गदर्शक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक सुदेश गिरमे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष सुधाकर वाघमारे, कामगार नेते हेमंत कोयते, नगरसेवक मंगेश खैरे,ॲड अजित वहिले,जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष सौरभ सावले, तुषार वहिले,संतोष खैरे,सचिन ढोरे, शैलेश वहिले, हभप विठ्ठलराव ढोरे,पंकज भामरे, रोहित गिरमे,अभिषेक ढोरे आदी उपस्थित होते.यावेळी जय मल्हार ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थित भाविकांना सुगंधी दूधचे वाटप करण्यात (Vadgaon) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.