Dapodi : दापोडी येथे दारूच्या नशेत कारचालकाने दिली तिघांना धडक

एमपीसी न्यूज – दापोडी येथे एका कार चालकाने (Dapodi) दारुच्या नशेत भरधाव वेगात कार चालवून तिघांना धडक दिली.  हा अपघात शुक्रवारी (दि.3) रात्री नऊ वाजता दापोडी रेल्वे स्टेशन रोड वरील दर्ग्याजवळ घडला.

यातील तिघांवरही पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Amit Gorkhe : निमित्त वाढदिवसाचे अन् लक्ष्य विधानसभेचे!

दापोडी दर्गा जवळील रोड हा वर्दळीचा रोड असून येथे असा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.