Pune station : पुणे स्टेशन येथे ई-बस चार्जिंग स्टेशन कार्यान्वित

एमपीसी न्यूज : पीएमपीसाठी पुणे रेल्वे स्टेशनशेजारील (Pune station) डेपोमध्ये उभारण्यात आलेले ई-बस चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाले आहे. या केंद्रावर सध्या 40 बसचे चार्जिंग केले जाणार असून येत्या काही महिन्यात येथे आणखी 90 बसचे चार्जिंग होऊ शकणार आहे.

पीएमपीने आपल्या ताफ्यातील डिझेलवरील बसचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. सध्या पीएमपी इलेक्ट्रिक बस तसेच सीएनजीवर धावणाऱ्या बसचाच वापर करत आहे. पीएमपीच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत चार्जिंगच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक बसच्या वापरावरही मर्यादा येत आहेत. पीएमपीसाठी शहराच्या चारही बाजूंना ई-बस चार्जिंग डेपो उभारण्यात आले आहेत.

 

P L Deshpande Park : सिंहगड रस्त्यावरील पु.लं. देशपांडे उद्यानात साकारले कलाग्राम

या ठिकाणी महापालिकेतर्फे चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यापैकी बाणेर तसेच वाघोली येथील चार्जिंग स्टेशनचा वापर सुरू झाला असून शुक्रवारपासून पुणे रेल्वे स्टेशन येथील डेपोमधील चार्जिंग सुविधाही कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
पुणे स्टेशन येथील डेपोमध्ये एकूण 5700 किलोवॉट क्षमतेची चार्जिंग सुविधा निर्माण केली जाणार आहे. यापैकी सध्या 1500 किलोवॉट क्षमता उपलब्ध होणार असून त्यात 40 बसचे चार्जिंग स्टेशन होऊ शकणार आहे. वाघोली येथील चार्जिंग स्टेशनमध्ये एकूण 6200 किलोवॉट क्षमतेची चार्जिंग सुविधा निर्माण केली जाईल. सध्या येथे 50 बसचे चार्जिंग होत असून हे स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित (Pune station) झाल्यानंतर येथे आणखी 105 बसचे चार्जिंग होऊ शकेल.

बाणेर येथील चार्जिंग स्टेशनमध्ये 4500 किलोवॉट क्षमतेची यंत्रणा असेल. तिथे सध्या 35 बसचे चार्जिंग होत असून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे आणखी 70 बसचे चार्जिंग होऊ शकेल. बिबवेवाडी येथील चार्जिंग स्टेशनची क्षमता 4000 किलोवॉट असेल. येथे 60 बसचे चार्जिंग होऊ शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.