P L Deshpande Park : सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात साकारले कलाग्राम

एमपीसी न्यूज : महापालिका आणि स्मार्ट सिटीकडून सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे (P L Deshpande Park) उद्यानात साकारण्यात येत असलेल्या कलाग्राम प्रकल्पाचे अंतिम टप्प्यात असून महिनाभरात सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना विविध वस्तू आणि ग्रामीण कलाकृतींच्या प्रात्यक्षिकांसह विविध राज्यांमधील लोककला आणि खाद्यपदार्थांची मेजवाणी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

Sahitya Sammelan : 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार वर्ध्यात!

कलाग्रामचा परिसर आणि बांधकाम एखाद्या गावातील वास्तूप्रमाणे साकारण्यात आले आहे. या ठिकाणी 30 गाळे असून त्यात एक ओपन अ‍ॅम्पी थिएटर, विविध राज्यांच्या वस्तूंच्या विक्रींचे काऊंटर, दोन लायब्ररी विविध राज्यांमधील खाद्यपदार्थ विक्री करणारे 12 स्टॉल, विविध प्रकारच्या कार्यशाळांसाठी दोन खुल्या व्यासपीठांचा समावेश आहे. या ठिकाणी बांबू व दगडांपासून तयार होणार्‍या विविध वस्तू व हस्तकलांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत.
अनेक वर्ष रखडलेले कलाग्रामचे (P L Deshpande Park) काम सध्या सुरू स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असून 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम सर्व कामे महिनाभरात पूर्ण होईल, असा विश्वास स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. या कामासाठी महापालिका, राज्य शासन आणि स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर कलाग्राम प्रकल्प स्मार्ट सिटीकडून महापालिकेला हस्तांतरीत केला जाणार आहे. त्यानंतर तो केव्हा सुरू करायचा, याचा निर्णय महापालिका घेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.