Mann Ki Baat : ‘मन की बात’द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा देण्याचे कर्तव्यनिष्ठ काम पंतप्रधान मोदी करत आहेत – अमित गोरखे

एमपीसी न्यूज : आज सकाळी 11 वाजता समाजमंदिर, कडोलकर कॉलनी, तळेगाव मावळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे प्रसारित होणाऱ्या 89 व्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat )कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपा ‘मन की बात’ पश्‍चिम महाराष्ट्राचे संयोजक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आपल्या भाषणात ते म्हणाले, की ”मन की बातच्या माध्यमातून गेले 89 महिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये प्रेरणादायी जागृती करण्याचे काम करत आहेत. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील घडत असलेल्या प्रेरणादायी घटना तसेच सामाजिक काम या कार्यक्रमाद्वारे अखंडपणे प्रसारित होत असते. याला सर्वदूर नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आज मावळ वासियांनी हा कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये चांगला संदेश दिला आहे.”

यावेळी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेशजी भेगडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक, स्वागत शक्ती केंद्रप्रमुख अमेय झेंड आणि आभार प्रदर्शन मन की बात संयोजक हिम्मतभाई पुरोहित (Mann Ki Baat )यांनी केले.

Dr. Shripal Sabnis : ध्येयवादी कृतीशीलता राखते समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक आरोग्य

 

यावेळी वाढदिवसानिमित्त उपाध्यक्ष सुधीर खांबेटे, भाजयुमो सचिव प्रसाद भेगडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन ‘मन की बात’ संयोजक हिम्मतभाई पुरोहित, भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे, जि.सचिव संजय वाडेकर, सरचिटणीस प्रमोद देशक, विनायक भेगडे, सचिव सोमनाथ त्रिंबके, भाजयुमो सचिव प्रसाद भेगडे, का.आ.उपाध्यक्ष सतिष पारगे, का.आ.सदस्य आतिष रावळे, ओ.मो.प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत यांनी (Mann Ki Baat) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.