Supriya Sule : ईडी सरकारला विनंती, पुणे जिल्ह्याला पालकमंत्री द्या – सुप्रिया सुळे

  एमपीसी न्यूज – ईडी सरकारला आग्रहाची विनंती पुणे जिल्ह्याला पालकमंत्री द्या.राज्यात दोन महिन्यांपासून अनेकांची कामे रखडली आहेत.सरकार पाडण्याची घाई केली.त्यासाठी कुठे कुठे जाऊन आले.त्यानंतर सरकार पाडलं आणि नवीन आलेलं.त्यालाही आता एक महिना झाला.एक महिन्यानंतरही पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नाही. हे फार दुर्दैवी आहे. त्यांना फक्त दादागिरी करण्यासाठी सत्ता हवी होती.सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता नको होती हे त्यांच्या कृतीमधून दिसून येते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये त्या बोलत होत्या. 

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज मी राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना खूप मिस करते. देशाला दिशा दाखवण्याचे काम राजेश टोपे करत होते.महाराष्ट्राने केल्यानंतर देश देखील त्याच मार्गाने चालायचा. आता राज्याचा आरोग्यमंत्री कोण आहे हेच लवकर कळत नाही. कोण कुठल्या पक्षात आहे कोण मंत्री आहे हेच लवकर कळत नाही.

 

राज्य सरकार कार्यक्रम आणि उत्सव करण्यामध्ये व्यस्त आहेत. बस्ता बांधला लग्न केलं आणि अजूनही त्यांचा हनिमून सुरू आहे. सर्वसामान्य जनतेची काम हे सरकार केव्हा करणार काय माहित? गेल्या दोन महिन्यात त्यांनी महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले. सरकार पाडायला एक महिना आणि बनवायला एक महिना लागला. यामध्ये त्यांचं कुठेही नुकसान झालं नाही. 50 खोके ऑल ओके.. सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके.. सर्वसामान्य माणूस महागाईने त्रासला आहे.. महाराष्ट्रात यापूर्वी अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.