PCMC : वाहतूक विभागाच्या पत्रामुळे पुणे बेंगळूर हायवेच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (PCMC) पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या पत्रामुळे पुणे बेंगळूर हायवेच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती आज सुरू करण्यात आली आहे. पुणे बेंगळुरू हायवे हा पिंपरी-चिंचवड शहरातून किवळेपासून वाकडपर्यंत जातो. या हायवेच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे खूप मोठे असल्याने पावसानंतर त्यामध्ये असे पावसाचे पाणी साचून डबके तयार होतात. त्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाताना वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त आनंद भोईटे (वाहतूक विभाग) म्हणाले, कि सर्व्हिस रोडवरील मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक विभागामार्फत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) यांना परवा पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रामध्ये त्यांना त्यांच्या रोडची देखभाल करणाऱ्या संस्थेकडून खड्ड्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, असे सांगण्यात आले होते. जर या खड्ड्यांमुळे कोणताही अपघात झाला व त्यामध्ये कुणीही जखमी झाले तर त्या संदर्भात तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.

Crime News : केबल कंपनीत मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

त्यामुळे आज एनएचएआय (PCMC) मार्फत या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. एक वाहनचालक अनिल कांबळे म्हणाले, की खड्ड्यांमुळे सर्व्हिस रोडवर दुचाकी चालवताना खूप त्रास सहन करावा लागतो. खड्डे चुकवत वाहन चालवावे लागते. दुसरे वाहनचालक राजेश तांबे म्हणाले, की पाणी भरल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे चुकून खोल खड्ड्यातून दुचाकी गेल्यास जोरात झटका बसतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.