BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शिक्षण समितीला शिक्षक दिनाची आठवण झाली, उद्या शिक्षक, शाळा पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज – शिक्षण दिनाला आठवडा उलटून गेल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण समितीला गुणवंत शिक्षक व शाळांचा गौरव करण्यास मुहूर्त लाभला आहे. उद्या (गुरुवारी) चिंचवड येथे पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी एकूण 31 शिक्षकांना व 4 शाळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्या सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.  एकूण 31 शिक्षकांना व 4 शाळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच गुणवत्ता वाढीसाठी काम करणारे विषयतज्ज्ञ, 10 तंत्रस्नेही व चालू वर्षी 100 ने पट संख्या वाढणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या 11 विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

महापालिका शाळेतील संतोष बेंद्रे, बाळुबाई माळी, जयश्री आसवले, शांता साकोरे, रणधीर सूर्यवंशी, शोभा घावटे, वैशाली तवटे, स्मिता बांदिवडेकर, राजेंद्र आहेर, अमृता जगताप, विजया टिळेकर, वसुंधरा कुलकर्णी, रेखा चौधरी, सविता गावडे, रामेश्‍वर पवार, सुलोचना चौधरी तर खासगी शाळेतील समीक्षा इसवे, मंजिरी ब्रह्मे, शर्वरी आठल्ये, चंदा नामदे, ज्ञानदेव गाडेकर, सचिन परब, अविनाश वाघ, आशाबी इनामदार, राहुल आल्हाट, लक्ष्मीछाया पृथ्वीराज, शोभा देवकाते, सुभाष देवकाते यांना गुणवंत शिक्षक तर मनिषा कुदळे, मंदा चव्हाण यांना आदर्श बालवाडी ताई पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महापालिकेची जाधववाडी येथील साईजीवन शाळा, पिंपळे निलख येथील शाळा तसेच खासगी शाळांमधून पिंपरीतील एच. ए. शाळा आणि निगडीतील मॉडर्न विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

HB_POST_END_FTR-A2

.