Crime News : वर्गणीवरून मंडळाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यातच जुंपली,एकावर कुऱ्हाडीने वार

एमपीसी न्यूज – पुणे, उत्तमनगर परिसरातील अहिरे गेट येथे मंडळाच्या माजी कार्यकर्त्याने गपणतीची वर्गणी मागण्यावरून झालेल्या वादात प्रमुखावर हल्ला केला.कुऱ्हाड आणि दगडाने त्यांच्यावर हल्लाकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

या घटनेत चंद्रकांत रामकृष्ण मोरे (वय 44) हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी जीवन सुरेश पवार (वय 20) याला अटक केली आहे.तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना भिकोबा मोरेनगर येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत मोरे यांचे मंडळ आहे.या मंडळाचा पुर्वी जीवन पवार देखील कार्यकर्ता होता.परंतु, यंदा तो मंडळात नाही.दरम्यान, मोरे व कार्यकर्ते हे एका व्यक्तीकडे वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्या व्यक्तीने जीवनला सांगितले दोन दिवसांनी वर्गणी देतो म्हणून सांगितले आहे, अशी माहिती दिली.त्यावेळी मोरे यांनी जीवनला बोलवण्याबाबत सांगितले. त्याचदरम्यान, जीवन याचे वडील तेथे आले.त्यांनी जीवनला कशाला बोलवता तो आता मंडळात नाही, असा प्रश्न मोरे यांना विचारला.त्यावरून मोरे व जीवन यांच्या वडीलांमध्ये शाब्दीक वाद झाले. मोरे यांनी त्यांना अपशब्द वापरले.त्याचा राग जीवनच्या मनात होता.त्यावरून सकाळी दहाच्या सुमारास जीवन व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी त्यांच्यावर कुर्हाडीने वारकरून त्यांना गंभीर जखमी केले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली.जीवन याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.