Hadapsar Murder News : हडपसर परिसरातील ‘त्या’ खुनाचा उलगडा, आई वरून शिवी दिल्याने केला खून

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापरे मळा याठिकाणी चार नोव्हेंबर रोजी दत्तात्रय साहेबराव कांबळे (वय 56) या व्यक्तीचा खून करण्यात आला होता. खून करून अज्ञात आरोपी पसार झाले होते. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात हडपसर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी खून केल्याप्रकरणी अमोल बबन रजपूत (वय 34) याला अटक केली. 

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कापरे मळा येथील एका पत्र्याच्या खोलीत दत्तात्रय कांबळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. त्यांचे डोके दगडांनी ठेचून खून करण्यात आला होता. हडपसर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता घटनेच्या दिवशी मयत दत्तात्रय कांबळे यांच्यासोबत अमोल रजपूत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.

मयत दत्तात्रय कांबळे याने अमोल राजपूत याला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. त्यामुळे अमोल राजपूत याने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून कांबळे यांचा खून केला असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.