Khed : बेकायदेशीर जमाव जमून शेतकऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर जमाव होतो म्हणून एका शेतकऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.29) खेड (Khed) येथे घडली आहे.

Lumpy Skin Disease : पशुपालकांनो! लम्पीच्या पार्श्वभूमीवर आपले पशुधन सांभाळा

याप्रकरणी अजित ज्ञानोबा मेदनकर (वय 43 रा. मेदन करवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विजय आप्पाजी गवते,बाळासाहेब आप्पाजी गवते, अजय बाळासाहेब गवते,प्रशांत बाळासाहेब गवते, अनिकेत बाळासाहेब गवते सर्व रा.मेदनकरवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या जमिनीवर बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला हाताने मारहाण केली. तसेच मारहाण करून लोखंडी पोल कापून नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.