Vadgaon Maval : शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून आपली आर्थिक स्थिती बळकट करावी – कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ

एमपीसी न्यूज – शेती व्यवसायाबरोबरच शेतक-यांनी शेतीपूरक व्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती बळकट करावी’ असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग तसेच कृषी पर्यटन व्यवसायातील शेतक-यांची विशेष सभा शिळाटने येथील आई कृषी पर्यटन केंद्रात घेण्यात आली. या सभेत कृषी अधिकारी पडवळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कृषीमंडल अधिकारी वसंत मोरे, पर्यवेशक विकास धेंडे, सहाय्यक दत्ता घोघरे, अंकुश पारधी हे कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

तर या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये चिक्की, जेली, मसाले उत्पादन करणा-या उद्योगातील श्रीकांत दळवी, अनिकेत कालेकर, सुनील राजीवडे, शंकर कालेकर, धनेश आंबेकर, महेश गरुड, गणपत भानुसघरे, नवनाथ कोंडभर, संभाजी आहेर, दत्ता कोंडभर,  दत्ता भानुसघरे, लक्ष्मण मोरे, हिरामण कटके, पांडुरंग भानुसघरे, सुरेश आंबेकर आदि उद्योजक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या या उद्योगासाठी असलेल्या कर्ज योजना, अनुदान योजना याबाबत विक्री व्यवस्था याबाबतची सखोल माहिती कृषी अधिकारी पडवळ यांनी लाभार्थींना दिली, या कार्यक्रमाचे नियोजन आई कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका संगीता भानुसघरे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.