Pune: अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल

FIR registered against Pune Sanjeevani ambulance services at Bibvewadi police station for overcharging a patient संजीवनी अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसेस असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपनीचे नाव आहे.

एमपीसी न्यूज- मोबाइल क्लिनिक व्हॅन म्हणून नोंदणी असतानाही तिचा अ‍ॅम्ब्युलन्स म्हणून वापर करून रुग्णांकडून जास्तीचे दर आकारणाऱ्या पुण्यातील अ‍ॅम्बुलन्स कंपनी विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवनी अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसेस असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपनीचे नाव आहे. अशाप्रकारे गुन्हा दाखल केल्याची कदाचित ही पुण्यातील पहिलीच वेळ असेल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मयूर दिलीप पुस्तके यांच्या मालकीच्या टेम्पो ट्रॅव्हलरची आरटीओकडे मोबाइल क्लिनिक व्हॅन म्हणून नोंदणी केली आहे. असे असतानाही या कंपनीकडून टेम्पो ट्रॅव्हलरचा वापर अ‍ॅम्ब्युलन्स म्हणून केला जात होता.


तसेच रुग्णांकडून आरटीओने ठरवून दिलेल्या पेक्षा अधिक भाडेही वसूल करण्यात आले होते. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.