Pune News : अग्निशमन दलाकडून घरात अडकलेल्या जेष्ठ महिलेची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज : आज शुक्रवार सकाळी साडेदहा वाजता अग्निशमन दलाकडे सहकारनगर, तुळशीबागवाले कॉलनी येथे एक जेष्ठ महिला (वय वर्षे 70) घराच्या दाराची कडी लागून आतमधे अडकली असून कोणताही प्रतिसाद देत नसल्याची वर्दि अग्निशमन नियंञण कक्षाकडे प्राप्त झाली होती.

दलाच्या नियंञण कक्षाने तेथे नजीकच्या जनता वसाहत अग्निशमन केंद्राकडे तातडीने वर्दि कळवत रवाना होण्यास सांगितले. तसेच सदरची घटना पोलिस विभागास कळवली. घटनास्थळी वेळेवर पोहोचत अग्निशमन दलाचे जवानांनी अडकलेल्या महिलेची माहिती घेत पहिल्या मजल्यावर शिडी लावून पाहणी केली असता ती महिला पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आली.

जवानांनी क्षणाचाही विलंब न करता खिडकी जवळच असलेली लोखंडी जाळी कटरच्या साह्याने कापत त्या घरात प्रवेश केला व कडी उघडून महिलेची सुखरूप सुटका केली.

सदर ठिकाणी जेष्ठ महिला घरात काम करताना अचानक पडल्याने त्यांना उठणे शक्य नव्हते व आवाजाला प्रतिसाद ही देऊ शकत नव्हत्या. जवान महेंद्र सकपाळ, संदिप घडशी व शैलेश गोरे तसेच वाहन चालक ॠषीकेश बिबवे यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक स्थानिकांनी केले व वेळेत मदत मिळाल्याने अग्निशमन दलाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.