pune: पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पुण्यामध्ये एका 52 वर्षीय कोरोनाबाधिताचा आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यात कोरोनाचा हा पहिला बळी आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा नऊ झाला आहे. 

पुण्यामध्ये दररोज कोरोनाचे नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. पुणे जिल्ह्यात 43 रुग्ण झाले आहेत. त्यातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्ण हा मधुमेही होता. उच्च रक्तदाबाचाही त्याला त्रास होता. उपचार सुरू असताना त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्याला कोरोनाचीही लागण झाली असल्याचे स्पष्ट होते. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला.

पुण्यात आणखी ३ कोरोनाग्रस्त !

शहरात आणखी ३ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यकृताच्या उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे भाऊ आणि वहिनी यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तर बर्म्युडा येथून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहरातील 26 व ग्रामीण भागातील पाच असे एकूण 31 कोरोनारुग्ण आढळले असून पिंपरी-चिंचवडचे 12 मिळून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 43 झाली आहे. उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या एकूण 15 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सक्रि़य कोरोनाबाधितांची संख्या 27 झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.