Pune Crime News : नवरीने गंडवलं; सात महिने संसार केल्यानंतर घरातील दागिने घेऊन फरार

एमपीसी न्यूज – विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आलाय. अंध व्यक्ती सोबत लग्न केल्यानंतर नवरीने सात महिने संसार केल्यानंतर घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. विमानतळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास कुमार सिंघवी, सारिका बंब, नंदलाल बंब, कमला बंब आणि राजू कोठारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनोद केसाराम चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विनोद चौधरी हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ते काम करतात. अंदाज असल्याने त्यांचा विवाह जमत नव्हता. त्यांच्या समाजातील मध्यस्थ कैलास कुमार सिंघवी यांच्यामार्फत त्यांना सारिका बंबचे स्थळ आले होते. विवाह करण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना पैसे द्यावे लागतील असे कैलास कुमार यांनी फिर्यादीला सांगितले होते. त्यानुसार फिर्यादीने वेळोवेळी आठ लाख 72 हजार रुपये त्यांना दिले. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.

विवाहाच्या सात महिन्यानंतर नवरी मुलीने कपाटातील ते 30 हजार रुपयांचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोख रक्कम देऊन पळ काढला. फिर्यादीने वारंवार यांच्याशी संपर्क साधला असता तिने परत येण्याचे आश्वासन दिले. परंतु ती काही परत आलीच नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.