Pune ED Raid : पुण्यातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांची ED कडून चौकशी?

एमपीसी न्यूज – ईडीने पुण्यातील बॉक्स बोर्डाच्या मालमत्तेवर छापे टाकल्याची चर्चा आज दिवसभर पुणे शहरात रंगली होती. तिकडून मात्र यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पुण्यातील ज्या व्यक्तीने वक्‍फ बोर्डाच्या मालमत्ता विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती त्यांनादेखील यासंदर्भात कुठलीही माहिती नाही.

पुण्यातील मुस्ताक अहमद फकृद्दिन शेख यांनी वक्फ बोर्डाची मालमत्ता कवडीमोल किमतीत विकत असल्याची लेखी तक्रार केली आहे. यामध्ये हिंजवडी येथील एक मालमत्ता आणि एका प्रसिद्ध दर्ग्याच्या मालमत्तेचा समावेश आहे. त्यामुळे याच जागेसंदर्भात ईडीने आज पुण्यात कारवाई केली असल्याची चर्चा होती. परंतु ईडीच्या कार्यालयाकडून मात्र याला अद्याप दुजोरा मिळाला नाही.

तक्रारदार असलेल्या मुस्ताक शेख यांनी सांगितले की, 3 नोव्हेंबरला मी मुंबईच्या ईडी कार्यालयात जाऊन गैरव्यवहाराबाबत लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि ज्या जागेविषयी तक्रार दिली त्या जागेची माहिती आणि पत्ते घेतले. परंतु आज कारवाई झाली की नाही याबद्दल मुस्ताक शेख यांना देखील काहीही माहीत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.